मुंबई : भंगाराचा माल काढत असताना सीएनजी गॅसमुळे दोन जण जखमी झाल्याची घटना दुपारी कुर्ला येथे घडली. दोन्ही जखमींवर सध्या एका केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुल्र्यातील एलबीएस रोड परिसरातील डायमंड उद्यानाजवळ दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येथील एका भंगाराच्या दुकानातून अब्दुल रहमान (24) आणि रहीस अहमद (25) भंगार काढत होते. याच दरम्यान एका गॅस सिलेंडरमधून अचानक गॅस बाहेर आला. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)