Join us  

हवेत गारवा कायम, मुंबईकरांना भरली हुडहुडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 5:00 AM

राज्यात शुक्रवारी सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश सेल्सिअस एवढे तर मुंबईचे किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

मुंबई : राज्यात शुक्रवारी सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश सेल्सिअस एवढे तर मुंबईचे किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईच्या किमान तापमानात २ अंशांची वाढ झाली. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले होते. दरम्यान, किमान तापमानात वाढ झाली असली तरी हवेत गारवा कायमच असल्याने मुंबईकरांना भरलेली हुडहुडी कायम आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.११ ते १४ जानेवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ११ आणि १२ जानेवारी रोजी मुंबईचे आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३०, १९ अंशाच्या आसपास राहील.>कमाल तापमान वाढले१० जानेवारी रोजी मुंबईचे कमाल तापमान ३२.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. मुंबईच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशाची वाढ झाली आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. समुद्राहून वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. सकाळी स्थिर होणारे वारे दुपारी स्थिर होतात. हे वारे दुपारी स्थिर होत असल्याने तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.>गारठा : बहुतांशी शहरांचा पारा १० अंशावरजळगाव १०नाशिक १०.८औरंगाबाद १०.६अकोला १०.७अमरावती १०बुलडाणा १०.२ब्रह्मपुरी ९.४गोंदिया ८.२नागपूर १०.१वाशिम १०.२वर्धा १०.२