Join us  

नववर्षात मुंबईत गारठा; विदर्भात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 3:23 AM

राज्यात गेले काही दिवस सर्वात कमी तापमान असलेल्या चंद्रपूरला बुधवारी थोडा दिलासा मिळाला. त्याच वेळी मुंबईच्या तापमानात आणखी घट होऊन १५ अंश सेल्सियस एवढी नोंद झाली.

मुंबई : राज्यात गेले काही दिवस सर्वात कमी तापमान असलेल्या चंद्रपूरला बुधवारी थोडा दिलासा मिळाला. त्याच वेळी मुंबईच्या तापमानात आणखी घट होऊन १५ अंश सेल्सियस एवढी नोंद झाली. तर नाशिकमध्ये सर्वात कमी १०.३ अंश सेल्सियस तापमान होते. पुढील दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.सन २०१९चा डिसेंबर महिना अन्य वर्षांतील डिसेंबर महिन्याच्या तुलनेत उष्ण ठरला. मात्र वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईच्या तापमानात घट होऊन १६.४ अंश सेल्सियस एवढी नोंद झाली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. सकाळचे तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले. विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते.चंद्रपूरमध्ये गेले दोन-तीन दिवस ५.१ अंश सेल्सियस तापमान होते. यामध्ये बुधवारी वाढ होऊन १०.६ अंश सेल्सियस नोंद झाली. कोकण-गोवा, मराठवाड्यात काही भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार आहे.नाशिकमध्ये सर्वांत कमी किमान तापमानबुधवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी कुलाबा येथे १७, तर सांताक्रुज येथे १५ अंश सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे १०.३ अंश सेल्सियस किमान तापमान होते. कुलाबा, माझगाव, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, अंधेरी, भांडुप येथील हवेचा दर्जा खालावला होता.