Join us

गरब्याला ‘झिंगाट’चा तडका, खेळणारेही यंदा होणार सैराट

By admin | Updated: September 27, 2016 02:45 IST

‘झिंगाट’ गाण्याचे सैराट अजूनही वेगवेगळ्या माध्यमांना, भाषांना वेड लावत असताना यंदाच्या गरबा नृत्यांनाही ‘झिंगाट’चा चरचरीत तडका मिळणार आहे. त्यामुळे गरब्याला

- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे

‘झिंगाट’ गाण्याचे सैराट अजूनही वेगवेगळ्या माध्यमांना, भाषांना वेड लावत असताना यंदाच्या गरबा नृत्यांनाही ‘झिंगाट’चा चरचरीत तडका मिळणार आहे. त्यामुळे गरब्याला मराठमोळा साज चढलेला पाहायला मिळेल. ओरिजनल ‘झिंगाट’सोबतच गरब्याचा ठेका दिलेला ‘झिंगाट गरबा’ यंदा सर्वत्र पाहायला मिळेल. सध्या ठाण्यात या झिंगाट गरब्याचा सराव सुरू असून आबालवृद्ध मोठ्या उत्साहात त्यात भाग घेत आहेत.‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्याने आबालवृद्धांना ‘याड लावलं’ आहे. सध्या समारंभापासून सर्वच सण-उत्सवांना झिंगाटचा फीव्हर चढला आहे. मग, एखादा विवाह सोहळा असो की आॅर्केस्ट्राकिंवा घरगुती मित्रमैत्रिणींची पार्टी असो ,‘झिंगाट’ गाण्यावर कोणी थिरकले नाही, तरच नवल! गणेशोत्सवातही सर्वत्र हेच गाणं वाजत होते. याचा प्रत्यय विसर्जन मिरवणुकीत सर्वांनाच आला. गणेशोत्सवापाठोपाठ आलेल्या नवरात्रोत्सवातही झिंगाटची क्रेझ दिसून येणार आहे. चक्क झिंगाट गाण्यावर गरबा खेळला जाणार आहे आणि या गरब्याचे प्रशिक्षण नृत्यदिग्दर्शिका वैशाली सत्रा देत आहेत. ‘आम्ही झिंगाट या गाण्याला गुजरातच्या गरब्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे त्यांनी सांगितले. पोपट, साल्सा, पारंपरिक गरबा, बॉलीवूड हे सर्व प्रकार एकत्र करून झिंगाट गरबा तयार केला आहे. गाण्याच्या सुरुवातीपासून ते गाणे संपेपर्यंत त्यावर विविध स्टेप्सचा गरबा खेळला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या गरब्यात पाच वर्षांपासून ४५ वर्षांपर्यंतचे गरबाप्रेमी सहभागी होणार आहेत. झिंगाट गरब्यानंतर बेली, हिपॉप आणि पारंपरिक गरब्याचे कॉम्बिनेशन असलेला गरबाही यंदा पाहायला मिळेल. तरुणाईत सध्या बेली आणि हिपॉपची क्रेझ असल्याने हा गरबा त्यांना शिकवला जात आहे.गरबाप्रेमी खेळणार १५० स्टेप्सचा दोडियोअंधेरी येथे होणाऱ्या गरब्याच्या स्पर्धेत ठाण्यातील २० प्रोफेशनल गरबाप्रेमी १५० स्टेप्सचा दोडियो गरबा खेळणार आहेत. सोमवारपासून रात्री १० ते ११ यावेळेत ते सराव करणार आहेत. या गरब्यात २० ते ३५ वर्षे वयोगटांतील गरबाप्रेमींचा सहभाग असेल. वैशाली यांनी दोन महिन्यांपूर्वी गुजरातला जाऊन या गरब्याचे खास प्रशिक्षण घेतले आणि त्या त्यांच्यासोबत सहभागी होणाऱ्या प्रोफेशनल गरबाप्रेमींना हा गरबा शिकवणार आहेत.