मुंबई : शहर-उपनगरांत नवरात्रौत्सवाचा रंग चढला असून, ठिकठिकाणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी रीघ वाढली आहे. शिवाय प्रसिद्ध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्या देवी पाहण्यास गर्दी होत आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये परंपरा टिकविण्यास लोककलांचे सादरीकरण होताना दिसून येते. त्यात या नऊ दिवसांमध्ये गोंधळ, मंगळागौर, कुंकुमार्चन आणि भजन असे वेगवेगळे कार्यक्रम होताना दिसतात. शिवाय बऱ्याच ठिकाणी विशेषकरून महिला भजनी मंडळेही भजनांचा कार्यक्रम घेताना दिसतात.दगडी चाळीची माय माऊली, गणेश गल्लीची लालबागची माता, बंगाल क्लबची देवी -शिवाजी पार्क, माझगाव कोळीवाड्याची आई भवानी, दादर पश्चिम विभाग सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, सायनची आई भवानी, परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ (कामगार मैदान), चिंचपोकळीची आई भवानी, नवी चिखलवाडी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, मालाड फुलांची आई - ओम साई मित्र मंडळ, रंगारी बदक चाळीची दुर्गामाता आणि माहीमची आई अशा काही शहर- उपनगरांतील सुप्रसिद्ध मंडळांच्या देवींचे दर्शन भक्तगण घेत आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईत गरबा रंगला!
By admin | Updated: September 27, 2014 06:23 IST