Join us
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेज चालकांना ठाेठावला १ हजार २०० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:24 IST

मुंबई : कांदिवली पश्चिम, खजुरिया अपार्टमेंट समोरील गॅरेजमध्ये येणारी चारचाकी वाहने रोडवरच दुरुस्त करण्यात येत असल्याने वाहने जाण्यासाठी ...

मुंबई : कांदिवली पश्चिम, खजुरिया अपार्टमेंट समोरील गॅरेजमध्ये येणारी चारचाकी वाहने रोडवरच दुरुस्त करण्यात येत असल्याने वाहने जाण्यासाठी जागा राहत नाही. फाइट फॉर राइट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी १ हजार २०० रुपये दंड ठोठावला, शिवाय अनधिकृत गॅरेज निष्कासन करण्याबाबत पत्रव्यवहार केला.

.............................................

नॅशनल पार्क झाले पर्यटकांसाठी खुले

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मंगळवारपासून सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत पर्यटकांसाठी खुले झाले. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता वनराणी, व्याघ्र सिंह विहार आणि नौका विहार बंद राहील. खासगी वाहनांना बंदी आहे. पर्यटकांना उद्यानात फिरण्यासाठी बेस्ट बसची साेय आहे. मास्क बंधनकारक असून, फक्त तुमणीपाडा गेटपर्यंतच प्रवेश आहे.

....................