Join us

गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलाचाच चित्रपटाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:07 IST

आलिया भट, संजय लीला भन्साळी यांना न्यायालयाने बजावले समन्सलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई ...

आलिया भट, संजय लीला भन्साळी यांना न्यायालयाने बजावले समन्स

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट घोषणेपासून वादात राहिला. आता या चित्रपटाविरोधात गंगुबाई कठियावाडी यांचा मुलगा बाबूराव शाह यांनी याचिका दाखल केली. त्यानंतर शिवडी सत्र न्यायालयाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेत्री आलिया भट आणि लेखकाला समन्स बजावले. या सर्वांना २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले.

या चित्रपटात अनेक चुकीच्या गोष्टी दाखवल्याचा दावा गंगुबाई यांच्या मुलाने केला. भन्साळींचा हा बहुचर्चित चित्रपट हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. याआधी कामाठीपुराच्या रहिवाशांनी चित्रपटातून कामाठीपुरा हा उल्लेख वगळावा, अशी मागणी मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडे केली होती.