Join us
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टरचा चौथा साथीदार गजाआड

By admin | Updated: September 10, 2014 01:59 IST

मुंबईतल्या एका पत्रकाराची सुपारी देणाऱ्या भुरट्या गँगस्टरचा चौथा साथीदार गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गजाआड केला

मुंबई : मुंबईतल्या एका पत्रकाराची सुपारी देणाऱ्या भुरट्या गँगस्टरचा चौथा साथीदार गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गजाआड केला. अब्दुल करीम शेख (३७) असे त्याचे नाव असून, त्याला खार परिसरातून पकडण्यात आले.५ सप्टेंबरला मरिन लाइन्स परिसरातून मालमत्ता कक्षाने मदन चांद सोनकर, आशुतोष वर्मा आणि राम चौहान या तिघांना अटक केली होती. तिघांकडे देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि सिम काडर््स सापडली होती. सोबत मुंबईतल्या एका पत्रकाराचा मोबाइल नंबर आणि त्याच्या दक्षिण मुंबईतल्या कार्यालयाचे दिशादर्शन करणारा नकाशा सापडला होता. याबाबत चौकशी केली असता भुरट्या गँगस्टरने या पत्रकाराची हत्या करण्याचे आदेश दिल्याचे या तिघांनी कबूल केले.दरम्यान, या तिघांना शेखने वाहन पुरवले होते. शेखविरोधात मोक्कान्वये गुन्हा दाखल असून, तो या भुरट्या गँगस्टरच्या संघटित गुन्हेगारी टोळीशी संलग्न आहे. त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भुरट्या गँगस्टरने मुंबई आणि आसपासच्या उपनगरांतील काही प्रतिष्ठित व्यक्तींना खंडणीसाठी धमक्या देण्यास सुरुवात केली होती. बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याच्या घरावर त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने या भुरट्यांच्या संपर्कात असलेल्यांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. यात मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक हत्येसाठी मुंबईत आलेल्या तिघांची माहिती मिळाली होती. (प्रतिनिधी)