Join us  

गँगस्टर इजाज लकडावालाला जन्मठेप, छोटा राजनची पुराव्याअभावी सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 1:00 PM

विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनची सुटका केली, तर दाऊद इब्राहिमचा सहकारी इजाज लकडावाला याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याला भारतीय दंडसंहिता व शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरविण्यात आले.

मुंबई : एका व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने गुरुवारी गँगस्टर इजाज लकडावाला यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर, छोटा राजनची पुरेशा पुराव्याअभावी सुटका केली. 

विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनची सुटका केली, तर दाऊद इब्राहिमचा सहकारी इजाज लकडावाला याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याला भारतीय दंडसंहिता व शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरविण्यात आले.

७ ऑक्टोबर १९९६ रोजी दोन अज्ञातांनी  व्यावसायिक  सय्यद फरीद मकबुल हुस्सेन यांच्यावर त्यांच्या मोहम्मद अली रोडवरील दुकानात घुसून गोळीबार केला. सय्यद जवळच्या रुग्णालयात गेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपास करून सुरुवातीला लकडावालाच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यात छोटा राजन फरारी असल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आला.

सय्यद यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांसमोर नानाचे (राजन) नाव घेतले. त्यानंतर पोलिसांनी तीन साक्षीदारांची साक्ष नोंदविली. या साक्षीदारांची साक्ष आणि सय्यद यांच्या भावाची साक्ष आरोपींना दोषी ठरविण्यासाठी पुरेशी आहे, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला सांगितले. 

टॅग्स :छोटा राजनन्यायालयजन्मठेप