Join us

रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांची चोरी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:17 IST

देवनार पाेलिसांची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांची चोरी करून त्याचा वाहन क्रमांक बदलून ती ...

देवनार पाेलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांची चोरी करून त्याचा वाहन क्रमांक बदलून ती विकणाऱ्या टोळीचा देवनार पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी गुरुवारी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५ वाहने जप्त करण्यात आली. देवनार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड परिसरात लॉक करून ठेवलेली रिक्षा २६ ते २७ ऑक्टोबरदरम्यान चाेरीला गेली हाेती. या प्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल हाेताच पाेलिसांनी तपासाअंती माजिद साबीर खान याला ७ तारखेला अटक केली. त्याच्या चौकशीतून तो आणि त्याच्या साथीदारांनी रिक्षांव्यतिरिक्त शीळफाटा, मुंब्रा, तळोजा, कुर्ला येथून कार चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

तपासाअंती संतोष हरिराम चौरासिया (३४), इस्तिखार इसरार अहमद खान (२८) या खानच्या दाेन साथीदारांना पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रिक्षासह पाच वाहने जप्त करण्यात आली असून, यात आणखी काेण सहभागी आहेत का, याचा शाेध पाेलीस घेत आहेत.

................................