Join us
Daily Top 2Weekly Top 5

रसायनांची चोरी करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: March 12, 2015 22:54 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल वालीव पोलीसांनी कारवाई करून टँकरमधील रसायन चोरणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे.

वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल वालीव पोलीसांनी कारवाई करून टँकरमधील रसायन चोरणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. या कारवाई दरम्यान पोलीसांनी १पिकअप व्हॅन व ९ टँकर जप्त केले आहेत. हे सर्व टँकर गुजरात येथील कंपन्यामध्ये नेण्यात येत होते. परंतु टँकरचालक नायगांव येथील एका ढाब्यावर सील तोडून रसायनाची चोरी करीत असत व हे रसायन थेट काळ्याबाजारात विकले जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.काल वालीव पोलिसांना एका धाब्यावर गुजरातला रसायन घेऊन जाणारे टँकर उभे असून त्यातील रसायन चोरण्यात येत असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी त्वरीत हालचाल करून नायगांव येथील या धाब्यावर धाड टाकली. त्यावेळी चोरी करणाऱ्या अरीफ अली, साजीद अन्सारी, पप्पू शेखर, मोहम्मद मुन्ना, महेंद्र सिंग, रुप सिंग, दिलबाग सिंग, महेंद्रसिंग जाट व शंभू यादव या ९ जणांना अटक करून मुद्देमाल जप्त केला. या टोळीचा मुख्य सूत्रधार इरफान अन्सारी मात्र या धाडी मधून निसटला. (प्रतिनिधी)