Join us

मुलीवर बलात्कार करणारा गजाआड

By admin | Updated: October 29, 2014 01:49 IST

घरकामासाठी घरी आणलेल्या 11 वर्षीय मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार केल्याप्रकरणी एका 53 वर्षीय व्यक्तीला विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे.

मुंुबई : घरकामासाठी घरी आणलेल्या 11 वर्षीय मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार केल्याप्रकरणी एका 53 वर्षीय व्यक्तीला विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 1 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घाटकोपर पश्चिमेकडील अमृतनगर परिसरातील देवआशिष इमारतीत ही व्यक्ती कुटुंबीयांसमवेत राहते. म्हैसूर येथील नातेवाइकांची 11 वर्षीय मुलगी गेल्या महिनाभरापासून या व्यक्तीकडे घरकाम करून राहत होती. 25 ऑक्टोबरला घरातील सर्व मंडळी गुजरात येथे गेल्याने तो या मुलीसोबत एकटाच घरी होता. हीच संधी साधून त्याने दोन दिवस अत्याचार केला़ मुलीने सोमवारी हा प्रकार शेजारी राहणा:या मैत्रिणीला सांगितला. शेजा:यांनी पार्कसाईट पोलीस ठाणो गाठून तक्रार दाखल केली.