Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिष दाखवून सामूहिक बलात्कार

By admin | Updated: November 25, 2014 01:59 IST

कळंबोली ‘सत्यम हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी आलेल्या एका महिलेला तिच्या भावाच्या भेटीचे आमिष दाखवून एका चौकडीने तिला कोलकाता येथे नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

तळोजा : कळंबोली ‘सत्यम हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी आलेल्या एका महिलेला तिच्या भावाच्या भेटीचे आमिष दाखवून एका चौकडीने तिला कोलकाता येथे नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिला तळोजा हद्दीतील एका गावात राहते. तब्येत बरी नसल्याने ती हॉस्पिटलमध्ये आली होती. याप्रकरणी मनोज नंदू तायडे व विनोद नंदू तायडे यांना अटक केली आहे. 
आरोपी अफसर सदू सय्यद, मनोज नंदू तायडे, विनोद नंदू तायडे, युनस सदू सय्यद (मु.पो. कोरा मोहा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांनी या महिलेला ‘आम्ही तुङया आईच्या गावाकडील आहोत. तुझा भाऊ कल्याणला आला आहे व तो लगेच कोलकात्याला जाणार आहे. त्याच्याशी तुझी भेट करून देतो, असे सांगितले. कल्याण येथे आल्यानंतर तो तर निघून गेला, आपण कोलकात्याला जाऊ, असे सांगून त्यांनी तिला आरोपी मनोज नंदू तायडे याच्या कोलकाता येथील घरी नेले. तिच्यावर बलात्कार केला. तेथून या महिलेला अफसर सदू सय्यद याने जळगाव येथील आपल्या बहिणीच्या घरी नेले. पुन्हा बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने शौचालयात जाण्याचा बहाणा करून तेथून पळ काढला व थेट मुंबई गाठली. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
लवकरच पकडू
तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत आहे. पोलीस उपनिरीक्षक हरेश काळसेकर तपास करीत असल्याचे समजते. याबाबत योग्य तो तपास केला जात असून आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळू, असा विश्वास मोरे यांनी वर्तविला.