Join us  

कुर्ल्यात विवाहितेवर तिघांचा सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 1:51 AM

थर्टी फर्स्टच्या रात्री शौचालयासाठी गेलेल्या विवाहितेवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना कुर्ल्यात उघडकीस आली आहे.

मुंबई : थर्टी फर्स्टच्या रात्री शौचालयासाठी गेलेल्या विवाहितेवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना कुर्ल्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी मुक्तार शेख (३९), शाहीद आरीफ (४८) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत, तर त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.कुर्ला परिसरात ३० वर्षीय विवाहिता कुटुंबीयांसोबत राहते. थर्टी फर्स्टच्या रात्री ती घराजवळील सार्वजनिक शौचालयाकडे निघाली. एकटी बेसावध पाहून दारूच्या नशेत असलेल्या त्रिकूटाने तिला हेरले आणि एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.घाबरलेल्या अवस्थेत महिलेने घर गाठले. याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. अखेर दोन दिवसांनंतर महिलेने याबाबत कुटुंबीयांना सांगितले आणि कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून कुर्ला पोलिसांनी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर, एका आरोपीने पळ काढला, तर आरिफ आणि शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :बलात्कार