Join us

महामार्गावर गाड्या लुटणारी टोळीचा छडा

By admin | Updated: July 14, 2014 01:37 IST

महामार्गावर गाड्या अडवून लुटणाऱ्या दरोडेखोरांना मोठ्या हिमतीने ट्रक चालकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना कासा भागात घडली.

कासा : महामार्गावर गाड्या अडवून लुटणाऱ्या दरोडेखोरांना मोठ्या हिमतीने ट्रक चालकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना कासा भागात घडली.मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटीजवळील मेंढवण खिंड परिसरात रात्रीच्या वेळी बऱ्याच वेळा दरोडेखोरांकडून गाड्या अडवून चालकांची व प्रवाशांची लुटमार झाल्याच्या घटना घडत होत्या. मागील आठवड्यात या भागातच लक्झरीतील प्रवाशांचीही ५८ हजारांची लूट झाली होती, मात्र काल रात्री या टोळीतील एका दरोडेखोरास ट्रक चालकांनी जीव धोक्यात टाकीत मोठ्या हिमतीने पकडले. संभल आग्रा ट्रान्सपोर्टचा ट्रक भिवंडी येथे माल उतरवून मेरठ (उत्तरप्रदेश) कडे जाण्यास निघाला असता मुंबई -अहमदाबाद महामार्गावर चारोटीजवळील वाडाखडकोना येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधोमध आणून थांबविण्यात आली व कारमधून पाचपैकी चार दरोडेखोर बाहेर आले. ट्रकच्या ड्रायव्हरच्या बाजूने दोन जण गाडीत चढले व एक हजार व लायसन्स घेतले. या दरम्यान ट्रकच्या दुसऱ्या बाजूने दोघेजण चढले. ट्रकमधील एक चालक मोहमद हुसेन व त्याचा सहकारी सलिय हुसेन यांना मारहाण करू लागले, मात्र त्यांनी धक्काबुक्कीत ट्रकच्या बाजूस ढकलून दिले व चालकाच्या बाजूने चढलेल्या शकिल शेख दरोडेखोरास ट्रकमध्ये पकडून ठेवले व ट्रक वेगाने महामार्गावरून पळवत नेत असताना दरोडेखोरांच्या गाडीने ट्रकला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना न जुमानता ट्रकचालक व त्याचे दोन साथीदार यांनी मेंढवण खिंडीतील पोलीस चौकीजवळ महामार्गावर कार्यरत असलेले पोलीस संदीप चव्हाण व संतोष वारघडे यांच्या ताब्यात या पकडलेल्या दरोडेखोराला दिले. पोलीस आल्याने उर्वरीत दरोडेखोरांनी पळ काढला. (वार्ताहर)