नवी मुंबई : धनदौलत व ऐश्वर्यासाठी मांडूळ सापाची तस्करी करणा:या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून चार साप व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये फिरोज खान (44) , रोहित मिश्र (23) , अनिल जाधव (21) यांचा समावेश आहे. यामधील दोन जण उत्तर प्रदेश तर एक जण सांगलीमधील रहिवासी आहे. मागील दोन वर्षापासून हे तिघे जण नवी मुंबईमध्ये मांडूळ या दुर्मीळ सापाच्या विक्रीचा व्यापार करीत होते. यापैकी विक्री करणा:याला चेकर या नावाने ओळखले जात होते. या सापांची विक्री ग्राहक पाहून केली जात असे. पाच कोटीपर्यंत या सापांची विक्री केली जात असे.
मांडूळ साप हा गुप्तधन शोधण्यासाठी मदत करतो व पैशांचा पाऊस पाडण्यामध्ये देखील या सापाची मदत होते अशी बतावणी करून हे आरोपी ग्राहकाला आपल्या जाळय़ात ओढत असत. आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचा:यांनी ग्राहक असल्याची बतावणी करीत खारघर येथील लिटील वल्र्ड मॉल येथे भेटण्यासाठी बोलाविले.
यावेळी तिघे आरोपी सापांना घेऊन आले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, अधिकराव पोळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष शिंदे, कृष्णा कोकणी व पोलीस हवालदार किरण राऊत यांच्या पथकाने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. (प्रतिनिधी)
मांडूळ हा साप दुर्मीळ असून त्याची विक्र ी वजनानुसार केली जाते. त्यासाठी आरोपी या सापांना इंजेक्शन टोचून फुगविण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे हा साप सुजून मोठा दिसेल असा त्यांचा उद्देश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.