रेल्वे प्रवाशांना गंडा घालणारी टोळी गजाआड
By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST
रेल्वे प्रवाशांना गंडा घालणारी टोळी गजाआड
रेल्वे प्रवाशांना गंडा घालणारी टोळी गजाआड
रेल्वे प्रवाशांना गंडा घालणारी टोळी गजाआडकुर्ला रेल्वे पोलिसांची कारवाईमुंबई : राज्याबाहेर जाणार्या प्रवाशांना तिकिटांच्या माध्यमातून गंडा घालणार्या ५ जणांच्या टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. यामध्ये काही रेल्वे कर्मचार्यांचादेखील समावेश असून याबाबत तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.गेल्या काही महिन्यांपासून लोकमान्य टिळक टर्मिंनसवर ही टोळी कार्यरत होती. इतर राज्यात जाण्यासाठी एखाद्या प्रवाशाला तत्काळ तिकीट हवी असल्यास, ती लगेच मिळत नाही. या तिकिटांसाठी आधी बुकिंग करावे लागते. मात्र, ही टोळी कैक पटीने जास्त पैसे आकारून प्रवाशांना तत्काळ तिकीट उपलब्ध करून देत असे. तिकिटांच्या दरापेक्षा प्रवाशांकडून कधी दुप्पट तर कधी चौपट पैसे आकारून ही टोळी लूट करत असे. काही प्रवाशांना तातडीने जायचे असल्याने त्यांची मोठी लूट या टोळीकडून व्हायची. मात्र प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचे आहे ते तिकीट न देता, काही स्थानक अगोदरची तिकिटे ही टोळी देत असे. त्यामुळे अनेक प्रवाशांना टीसींनी दंड ठोठावल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गेल्या महिन्याभरात तीन प्रवाशांनी तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र या टोळीतील कोणीही पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर पोलिसांनीच प्रवासी बनून लोकमान्य टर्मिनसवर तिकिटासाठी रांगा लावल्या. याच दरम्यान या टोळीतील देवेंद्र पाटील (३१) आणि बदरू शेख (३४) हे दोघे जण या ठिकाणी आले. पोलिसांनी तत्काळ त्यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अब्रेस रंजन (२०), सूरजकुमार यादव आणि मंगळदेव शर्मा (३४) या तिघांचीदेखील नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी तिघांनादेखील अटक केली असून यामध्ये रेल्वेच्या काही कर्मचार्यांचादेखील समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)