Join us

दागिन्यांच्या चोरीप्रकरणी टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:36 IST

कुरार पोलिसांची कारवाईदागिन्यांच्या चोरीप्रकरणी टोळीला अटककुरार पोलिसांची कारवाई : राज्यभरात ५० गुन्हे दाखललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

कुरार पोलिसांची कारवाई

दागिन्यांच्या चोरीप्रकरणी टोळीला अटक

कुरार पोलिसांची कारवाई : राज्यभरात ५० गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दागिन्यांच्या दुकानात खरेदीसाठी जाऊन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कुरार पोलिसांनी केला. या टोळीवर महाराष्ट्रात अशाच प्रकारचे ५० हून अधिक गुन्हे दाखल असून, त्यांच्या पसार साथीदारांचा शोध सुरू आहे.

रेखा वाणी (४५), अक्षय वाणी (१९), शेखर वाणी (२८), रेणुका वाणी (२३), नरेंद्र साळुंखे (३५) आणि व्यवसायाने टॅक्सी चालक असलेल्या आशुतोष मिश्रा या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने १३ जानेवारी, २०२१ रोजी मयूर ज्वेलर्स नामक दुकानातून १० ताेळे सोने लंपास केले होते. त्यानुसार कुरार पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली हाेती.

कुरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने सीसीटीव्हीची पडताळणी करून तपासाअंती सहा जणांना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून जवळपास दोन लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

......................