Join us  

गणेशपुरे यांच्या मोबाइल चोराची ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 5:00 AM

समतानगर पोलिसांना यश

मुंबई : कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर विनोदवीर आणि अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या मोबाईलची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीची ओळख पटविण्यात समतानगर पोलिसांना यश मिळाले आहे.‘चला हवा येऊ द्या’फेम प्रसिद्ध अभिनेते तसेच विनोदवीर भारत गणेशपुरे यांचा मोबाइल कांदिवली हायवेवर लंपास करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीची ओळख पटविण्यात समतानगर पोलिसांना यश मिळाले असून कोणत्याही टोळीशी त्यांचा संबंध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा गाशा गुंडाळण्यात येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी आमचे पथक योग्य दिशेने तपास करत असल्याचे परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गणेशपुरे यांच्या कारवर ठकठक करत करत दोन इसमांनी कांदिवली पश्चिम द्रुतगती मार्गावर हा प्रकार केला होता. ४ आॅगस्ट, २०२० रोजी याठिकाणी दरड कोसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी होती. त्याचाच फायदा घेत चोरांनी ही संधी साधली. गणेशपुरे यांनी स्वत: ‘फेसबुक’वर याचा व्हिडीओ पोस्ट करत त्याची माहिती दिली आणि त्यानंतर समतानगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. माझ्यासोबत ही घटना घडली आहे. मात्र, तुम्ही सतर्क राहा. सध्या कोरोनाची स्थिती आहे, असाही इशारा दिला होता.गणेशपुरे यांच्या कारवर ठकठक करत करत दोन इसमानी कांदिवली पश्चिम द्रुतगती मार्गावर हा प्रकार केला होता. ४ आॅगस्ट, २०२० रोजी दरड कोसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी होती.