बोर्डी : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. परदेशात गणरायाची क्रेझ वाढत आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत बलसाड जिल्ह्यात महाराष्ट्रातील विविध भागातून मराठी कुटुंबे कामानिमित्त स्थायिक झाली आहेत. येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करुन सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करीत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात घरोघरी गणेशोत्सव साजरा होतो. परदेशातील गणरायाचे विधिवत पूजन होते. महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत बलसाड जिल्ह्यात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातून मराठी कुटुंबे कामानिमित्त स्थायिक झाली आहेत. बिल्लीमोरा, भिलाड, संजाण, उंबरगाव इ. ठिकाणी प्रमाण अधिक आहे. त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याकरिता सार्वजनिक गणेशमंडळांची स्थापना केली आहे. स्थानिक गुजराती, उत्तरभारतीय, जैन धर्मीय उत्साहाने एकत्र येतात. नवरात्र मंडळाचे योगदान महत्वपूर्ण आहे. उंबरगाव तालुक्यातील जीआयडीसी कॉलनी, गांधीवाडी कल्पतरु इ. भागांत जल्लोषपूर्ण वातावरण दिसून येत आहे. डहाणूत अनेक माहेरवाशिणींचं सासर आहे. गणेशोत्सवाची परंपरा सासरी रुजवण्यात महत्वाचा वाटा आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमा भागात गणेशोत्सवाच्या माध्यमातून शांती, एकोपा आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण होत असून सीमेलगत जनतेने हा आदर्श वृद्धिंगत केला आहे. (वार्ताहर)
सीमा भागातील गणेशोत्सव
By admin | Updated: August 29, 2014 00:19 IST