Join us

गणेश पांडेला अद्याप अटक नाही

By admin | Updated: April 1, 2016 01:57 IST

एका महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेला भाजयुमोचा माजी अध्यक्ष गणेश पांडे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम

मुंबई : एका महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेला भाजयुमोचा माजी अध्यक्ष गणेश पांडे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरु असल्याचे वर्सोवा पोलिसांकडून सांगण्यात आले.भाजपामध्ये कार्यरत असलेल्या मैथिली जावकर यांनी पांडे याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. मात्र पांडेला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. विनयभंगाचे हे प्रकरण थोडे संवेदनशील असल्याने पांडे विरोधात ठोस पुरावे गोळा करणे गरजेचे आहे, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल, अशी माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांनी दिली. (प्रतिनिधी)