Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘गानप्रभा' उत्सवचे रंग

By admin | Updated: June 6, 2015 23:04 IST

‘हृदयेश आटर््स' तर्फे विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असते. केवळ किफायतशीर कार्यक्रम न करता सामाजिक उत्तरदायित्व पार पाडणारे

‘हृदयेश आटर््स' तर्फे विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असते. केवळ किफायतशीर कार्यक्रम न करता सामाजिक उत्तरदायित्व पार पाडणारे कार्यक्रम ‘हृदयेश'तर्फे आयोजित केले जातात ही विशेष कौतुकाची बाब ! ‘गानप्रभा’ हा असाच एक उपक्रम. ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या सन्मानार्थ दहा वर्षांपूर्वी हे संमेलन ‘हृदयेश'ने सुरू केले. गायन-वादन क्षेत्रातील तरुण रक्ताला वाव देण्याच्या उद्देशाने रागदारी हा मंच उभारण्यात आला. सातत्याने आणि अत्यंत यशस्वीरीतीने तो राबविण्यात आला आहे. त्याबद्दल ‘हृदयेश' ही संस्था अभिनंदनास पात्र आहे.यंदाचा ‘गानप्रभा’ उत्सव विलेपार्ल्यातील डहाणूकर महाविद्यालयात झाला. परितोष पोहनकरच्या गायनाने या संमेलनाला सुरुवात झाली. त्याने संगतीला ‘सारंगी’ घेतली होती हे पाहूनच आनंद झाला. पोहनकर कुटुंबात जन्म झाल्यामुळे साहजिकच घरातून संगीताचे बाळकडू मिळाले. शिवाय कोलकात्यात स्थायिक असणारे किराणा घराण्याचे उस्ताद मश्कूर अली खान यांच्याकडे त्याने विधिवत तालीम घेऊन आपले गाणे वाढवले आहे. वेगवान तानेवर त्याचा चांगला जम बसला आहे हे त्याच्या उत्तम सादरीकरणातून लक्षात आले.कोलकात्यात राहणारा तरुण सतारवादक शुभ्रनील सरकार याचे वादन त्यानंतर झाले. तो सध्याचे आघाडीचे सतारवादक शाहिद परवेझ यांचा शिष्य आहे. अत्यंत तयार हात आणि रागदारीची चांगली जाण तसेच पकड हे त्याचे वैशिष्ट्य. त्याने ‘झिंजोटी' राग विस्ताराने वाजवला. हा विस्तारही तसा आटोपशीर होता. आलाप, जोड, गत आणि झाला अशा सर्व अंगांनी वादक रागाचा विस्तार करतो. त्यात पुनरुक्ती झाली तर वादन कंटाळवाणे होऊ शकते. शुभ्रनीलने पुनरुक्ती टाळली. त्याने वाजविलेली ‘खमाज' धून तर छानच होती. प्रफुल्ल आठल्येने उत्कृष्ट तबलासाथ केली. सानिया पाटणकर या तरुण पिढीतल्या ज्येष्ठ गायिकेने ‘नंद' रागातला ख्याल, सरगम गीत तयारीने सादर केले.कौस्तव कांती गांगुली या चक्रवर्तींच्या शिष्याने हुबेहूब गुरूच्या ढंगाने आणि आवाजात ‘भीमपलास' मांडला आणि नंतर ‘सरस्वती'. निनाद मुळावकर (बासरी), ओजस अढिया (एकल तबला), श्रुती भावे (व्हायोलिन), आदित्य मोडक आणि ओंकार दादरकर यांचे गायन-वादनही या कार्यक्रमात झाले.रागदारीअमरेंद्र धनेश्वर