Join us  

'रोप वे' शहरातील वाहतुक व्यवस्थेचे 'गेम चेंजर' - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 9:40 PM

वाहतूक व्यवसस्थेसाठी जल वाहतुकीला प्राथमिकता आहे. दुसर्या क्रमाकांवर रेल्वे असून रस्ते तिसऱ्या मार्गावर आहे. मात्र रस्ते वाहतूकीचा सर्वात जास्त वापर झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

मुंबई  - वाहतूक व्यवसस्थेसाठी जल वाहतुकीला प्राथमिकता आहे. दुसर्या क्रमाकांवर रेल्वे असून रस्ते तिसऱ्या मार्गावर आहे. मात्र रस्ते वाहतूकीचा सर्वात जास्त वापर झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहतूक व्यवस्थेत रोप वे गेम चेंजरची भूमिका पार पडणार ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला. इंडियन पोर्ट रेल कार्पोरेशन आयोजित अंधेरी येथे दोन दिवसीय रोपवे विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी नितीन गडकरी बोलत होते.रोप वे विकास कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया आणि इंडियन पोर्ट रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनुप अग्रवाल उपस्थित होते.

टॅग्स :नितिन गडकरीमुंबई