Join us

गजेंद्र चौहान यांनी स्वेच्छेने राजीनामा द्यावा- ऋषी कपूर

By admin | Updated: July 10, 2015 11:24 IST

एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी स्वेच्छेने पद सोडावे असा सल्ला ऋषी कपूर यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - अभिनेता रणबीर कपूरकने एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केल्याची बातमी ताजी असतानाच त्याचे वडील व अभिनेता ऋषी कपूर यांनीही या वादसंदर्भात भाष्य केले आहे. 'आत्तापर्यंत झालेले सर्व वाद आणि आंदोलनांनंतर एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी स्वेच्छेने पद सोडावे' असा सल्ला ऋषी कपूर यांनी दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. 
'सध्या सुरू असलेली आंदोलने व एकूण वाद पाहता गजेंद्र चौहान यांनी स्वत:हून पदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला मला द्यावासा वाटतो.  जर त्यांना (विद्यार्थी) तुम्ही (पदावर) नको असाल तर असे करणेच संयुक्तिक ठरेल. अध्यक्षपदासाठी तुमच्याच नावाचा आग्रह कायम ठेवून काहीच होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वाभिमानाने पद सोडावे' असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे.
यापूर्वी अभिनेता रणबीर कपूरने एफटीआयआय्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला होता. 'विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशीच व्यक्ती अध्यक्षपदी नेमावी' असे मत त्याने व्यक्त केले होते.