Join us

विद्यार्थिनीला पॉर्न साईट दाखविणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:09 IST

बोरिवलीतील प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यार्थिनीला रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाइलवर पॉर्न व्हिडिओ दाखविण्याचा प्रयत्न एका विकृताने केला. ...

बोरिवलीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विद्यार्थिनीला रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाइलवर पॉर्न व्हिडिओ दाखविण्याचा प्रयत्न एका विकृताने केला. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी त्याला अटक केली. राकेश निकाळजे (वय ३७) असे त्याचे नाव असून तो आरे परिसरात राहतो.

शिकवणीसाठी गेलेली तक्रारदार विद्यार्थिनी ही मंगळवारी बोरिवली पश्चिमच्या कल्पना चावला चौकातून परतत होती. त्यावेळी निकाळजे तेथे आला आणि चिकुवाडीला कसे जायचे, असे तिला विचारू लागला. तिने त्याला मार्गदर्शन केले. त्याचवेळी त्याने स्वतःच्या मोबाईलमधील एक अश्लील व्हिडिओ तिला दाखविण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो रस्ता ओलांडू लागला. मात्र विद्यार्थिनीने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक तेथे गोळा झाले आणि तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. तसेच तातडीने तिच्या वडिलांनाही फोन केला. तेदेखील घटनास्थळी पोहोचले आणि अखेर निकाळजे याला बोरिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. विनयभंगाचे कलम लावून पोलिसांनी निकाळजेला अटक केली.

....................................