Join us
Daily Top 2Weekly Top 5

गेल ऑम्वेट आदरांजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:06 IST

मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, विचारवंत, फुले आंबेडकरवादी लेखिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गेल ऑम्वेट यांच्या जाहीर आदरांजली सभेचे ...

मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, विचारवंत, फुले आंबेडकरवादी लेखिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गेल ऑम्वेट यांच्या जाहीर आदरांजली सभेचे आयोजन परिवर्तन साहित्य महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. रविवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही आदरांजली सभा होणार आहे.

या सभेत अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, बबन कांबळे, परिवर्तन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. ऋषिकेश कांबळे आदी वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक गौतम सोनवणे आणि वैभव काळखैर यांनी दिली आहे.

गेल ऑम्वेट यांनी दलित आदिवासी कष्टकरी वर्गासाठी तसेच परित्यक्ता स्त्रिया, दुष्काळग्रस्त अशा सर्व समाजघटकांसाठी काम केले. त्यांचे नुकतेच निधन झाले. अमेरिकेत जन्मलेल्या डॉ. गेल ऑम्वेट यांनी बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकरी विचार आत्मसात करून संपूर्ण जीवनपरिवर्तन चळवळीसाठी वाहिले. त्यांची आंबेडकरी विचारांशी नाळ घट्ट जुळली होती. त्यामुळे परिवर्तन साहित्य महामंडळाच्या वतीने गेल ऑम्वेट यांना जाहीर श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या सभेचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या आदरांजली सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.