Join us

गॅगस्टर पराडकरची जामिनावर सुटका

By admin | Updated: November 7, 2015 22:27 IST

भांडुपमधील बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या गॅगस्टर निलेश पराडकरची शनिवारी १५ हजाराच्या वयैक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला

- व्यावसायिकाकडून खंडणी प्रकरण

मुंबई : भांडुपमधील बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या गॅगस्टर निलेश पराडकरची शनिवारी १५ हजाराच्या वयैक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. बांधकाम व्यावसायिकाकडून १५ कोटीची मागणी केल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी पराडकरला मंगळवारी अटक केली होती. त्याच्यासह रघु शेट्टी,छोटा राजनला ‘वॉन्टेड’ आरोपी दाखवण्यात आले होते.न्यायालयाने पराडकरला १९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.शनिवारी त्याने केलेल्या जामिन अर्जावर मुलुंड न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी १५ हजार रुपयांच्या रक्कमेवर पराडकरला जामीन मिळाला आहे.