Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोविड काळात धैर्य खचू न देता भविष्य साकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:10 IST

मुंबई : चेंबूरच्या ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना ...

मुंबई : चेंबूरच्या ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यात अनाथ विद्यार्थी, एकल पालक विद्यार्थी यांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डोळस यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी कोविड संक्रमण काळात आपले धैर्य खचू न देता आपले भविष्य साकारावे व त्याबरोबर देशाचेही नाव उज्ज्वल करावे, असे त्यांनी सांगितले. एन.सी.सी. युनिटने मानवंदना दिली. गोवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस दलातील अधिकारी यांनी या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती याबद्दल आपले विचार सांगितले. चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचे पदाधिकारी म्हापणकर तसेच शैलेश आचार्य यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या साबिता चोप्रा, प्रा. जयश्री जंगले, प्रा. कोकणे, प्रा. शरद दहीवाले, प्रा. प्रह्लाद आंधळे, प्रा.मृदुला वाघमारे यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.