Join us

मुंबईत ‘फुटाणो’ तडतडले; दिल्लीत खासदार ‘आठवले’

By admin | Updated: August 17, 2014 01:14 IST

शबनमवाले : होय. मी रामदास. साहित्यातला. निळे जाकिटवाले : मीसुध्दा रामदास.. पण राजकारणातला.

(पूर्वी एकच अखिल भारतीय साहित्य संमेलन भरायचं. आता गल्लीबोळात सतराशे साठ होताहेत. अशाच एका मतमोजणी गोदाम केंद्राजवळ ‘निवडणूकपूर्व’ साहित्य संमेलन भरलेलं. दोन लोकप्रिय व्यक्ती मंडपात अवतरतात.)
संयोजक : नमस्कार.. आपण दोघेही 
इकडं ?
शबनमवाले : होय. मी रामदास. साहित्यातला. 
निळे जाकिटवाले : मीसुध्दा रामदास.. पण राजकारणातला.
संयोजक : साहित्य संमेलनात राजकारण रंगतं. राजकारणात साहित्य खुलतं, हे मला ठावूक होतं; पण ‘साहित्य अन् राजकारण’ हातात हात घालून फिरतं; हे मी पहिल्यांदाच पाहतोय बुवा!
शबनमवाले : (लगेच इरसाल वात्रटिका पेश करत) वरून पवारांशी सलगी अन् आतून शिंदेंशीही दोस्ती.. म्हणूनच विधानपरिषदेत रंगली, माङया शब्दांची कुस्ती!
निळे जाकिटवाले : (दाढीवरून हात फिरवित) मुंबईत जरी पूर्वी, शरदाचे ‘फुटाणो’ तडतडले.. दिल्लीत मात्र मोदींना, यंदा आम्हीच ‘आठवले’!
संयोजक : (कवितेचा सूर पकडत) पण आमच्या संमेलनात तुम्ही कसे काय अवतरले? वेळ कसा मिळाला?
शबनमवाले : (सुस्कारा टाकत) ‘आघाडी’चे साहित्यिक आम्ही, निवडणुकीत शब्दांचा :हास आहे.. निकालानंतर बहुधा आम्हाला, पर्यटनाचाच वनवास आहे! निघतो मी.
निळे जाकिटवाले : थांबा. अजून एक कविता सुचलीय.
शबनमवाले : ( मिश्कीलपणो) नाव ‘रामदास’ म्हणजे,  आपली भाषा खास आहे.. केवळ नावातल्या साम्यामुळे,  ‘आठवलें’चा हा भास आहे.
निळे जाकिटवाले : (नेहमीप्रमाणं डोळे मिटून) तुम्ही ‘आघाडी’चे कवी, आम्ही ‘युती’चे पांडव.. जागा देण्या-घेण्यावरून पहा, होणार जोरात तांडव!
शबनमवाले : तुमची भाषा जहाल, म्हणून ‘राखी’ पक्षाची वाणी.. ऐकुनि तिची मुक्ताफळे, विरोधकही पळतील अनवाणी!
निळे जाकिटवाले : जवळ जाऊनि पहा, कमळ किती छान-छान.. त्याच्या पाकळ्यांमधुनि मारू, धनुष्यावरच बाण!
शबनमवाले : ( शेवटची वात्रटिका सादर करत) ‘निळी निशाणी’वाले रामदास, ‘भगव्या’ कमळासोबत रंगले.. ‘मातोश्री’च्या जागा अडवून, चक्क खासदारकीला जागले!
- सचिन जवळकोटे