मुंबई : मुंबई विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या (एलएलबी-बीएसएल) सातव्या सत्राच्या परीक्षांचे निकाल बुधवारी विद्यापीठाने जाहीर केले आहेत.रखडलेल्या निकालांमुळे बिघडणारी परिस्थिती सावरण्याची विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची कसरत सुरू आहे. मंगळवारी पहिल्या आणि पाचव्या सत्राचे निकाल जाहीर केल्यानंतर, आता बुधवारी सातव्या सत्राच्या विद्याार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले.या परीक्षेला १ हजार ६९५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ४९.२७ आहे.
विधी अभ्यासक्रमाचा आणखी एक निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 06:45 IST