Join us

उग्र दर्प : डोंबिवलीकरांचे मंत्र्यांना साकडे

By admin | Updated: February 27, 2015 22:39 IST

एमआयडीसी भागातील स्थानिक रहिवाशांना रासायनिक दुर्गंधीमुळे श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होत आहे. यासंदर्भात त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारदेखील केली आहे.

डोंबिवली : एमआयडीसी भागातील स्थानिक रहिवाशांना रासायनिक दुर्गंधीमुळे श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होत आहे. यासंदर्भात त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारदेखील केली आहे. यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी डोंबिवलीकरांनी एका सामाजिक संस्थेसह पर्यावरणमंत्री प्रवीण पोटे आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे़मंगळवारी रात्री साडेआठ ते दहाच्या सुमारास उग्र दर्पामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे त्यांनी उशिराने रात्री मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची माहिती पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)