Join us

पनवेल नगर परिषदचे कामकाज आॅनलाइन

By admin | Updated: January 15, 2015 02:08 IST

शासकीय कार्यालयात पारदर्शकता व कामकाज ई-गव्हर्नन्सने जोडण्याचा शासनाचा एक भाग म्हणून पनवेल नगर परिषदेचे कामकाजही आॅनलाइन करण्यात येणार आहे.

पनवेल : शासकीय कार्यालयात पारदर्शकता व कामकाज ई-गव्हर्नन्सने जोडण्याचा शासनाचा एक भाग म्हणून पनवेल नगर परिषदेचे कामकाजही आॅनलाइन करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या विविध कर भरता येणार असून, पेमेंट गेटवे सॉफ्टवेअर प्रणाली वापरली जाईल .कर भरण्यासाठी नागरिकांना फेऱ्या माराव्या लागतात. यामध्ये वेळही वाया जाते. मात्र आॅनलाइनमुळे नागरिकांची सुटका होणार आहे. नगरपरिषदेमार्फत आकारण्यात येणारी पाणीपट्टी, घरपट्टी आॅनलाइन भरता येईल. यामुळे कर्मचाऱ्यांचा ताण हलका होणार आहे. तसेच फडके नाट्यगृहाचे कामकाज देखील आॅनलाइन करण्यासंदर्भात नगरपरिषद विचाराधीन आहे. नाट्य रसिकांना काही वेळा पसंतीच्या नाटकाचे तिकीट मिळत नाही. अनेक जण वशिलेबाजी वापरुन तिकीट मिळवतात त्यामुळे अनेक जणांना या नाटकांना मुकावे लागते . मात्र आॅनलाइन प्रक्रियेमुळे ही संपूर्ण माहिती घरबसल्या मिळणार असून नाटकांचे तिकीट देखील आॅनलाइन बुक करता येणार आहे. इबीएम सिस्टीमद्वारेही आॅनलाइन प्रणाली सुरु करण्यात येणार आहे . (वार्ताहर)