Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ अभियानास संपूर्ण सहकार्य

By admin | Updated: October 29, 2014 22:20 IST

‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या अभियानाकरिता स्वच्छतादूत म्हणून ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली.

अलिबाग : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवलंबलेल्या ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या अभियानाकरिता स्वच्छतादूत म्हणून ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली. या उभयतांमध्ये झालेल्या चर्चेअंती या समाजोपयोगी अभियानास आपला संपूर्ण पाठिंबा आणि सक्रिय सहभाग राहणार असल्याचे आप्पासाहेबांनी बुधवारी रेवदंडा येथे त्यांच्या निवासस्थानी सांगितले.
येत्या 31 ऑक्टोबर रोजी होणा:या राष्ट्रीय एकता रॅलीच्या निमित्ताने रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आप्पासाहेबांशी रेवदंडा येथे चर्चा केली. राष्ट्रीय एकता रॅलीच्या शुभारंभास आप्पासाहेबांनी येण्याचे मान्य करुन संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. 
31 ऑक्टोबरपासून नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर गतवर्षीप्रमाणो मुंबई शहरात देखील विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.