Join us

पादचा-याला लुटणारा तोतया पोलीस गजाआड

By admin | Updated: August 26, 2014 23:39 IST

रात्रीच्या वेळी पोलीस असल्याचे बतावणी करून पादचाऱ्यांना लुटणाऱ्या दोघा तोतया पोलिसांना कळंबोली पोलिसांनी गजाआड केले आहे.

पनवेल : रात्रीच्या वेळी पोलीस असल्याचे बतावणी करून पादचाऱ्यांना लुटणाऱ्या दोघा तोतया पोलिसांना कळंबोली पोलिसांनी गजाआड केले आहे.कळंबोली वसाहत येथील राकेश कुमार व सुभाष कुमार हे महामार्गावरील उड्डाणपुलाखालील भुयारी मार्गावर थांबले असताना अचानकपणे निळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले व त्यांनी आपण पोलीस असल्याचे भासवून तुम्ही येथे काय करता, तुमची ओळख सांगा, असे सांगून त्यांच्या पाकिटातील चार हजार रुपये काढून घेतले व ते पसार झाले. याबाबतची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक या दोन तोतया पोलिसांचा अधिक शोध घेत असताना ते दोघेजण रोडपालीजवळील पल्लवी हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून आरोपी इम्रान सरताज शेख (३०) आणि अमन वशीअल्ला शेख (२३) दोघेही रा. मुंब्रा य दोघांना गजाआड केले आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात फसवणुकीच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)