Join us

शिवसेनेसमोर दुहेरी आव्हान

By admin | Updated: October 7, 2014 02:00 IST

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दिंडोशी मतदारसंघ २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे फॅक्टरमुळे निसटला़ याचा फायदा काँग्रेसला मिळून राजहंस सिंह आमदार झाले़

शेफाली परब, मुंबईशिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दिंडोशी मतदारसंघ २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे फॅक्टरमुळे निसटला़ याचा फायदा काँग्रेसला मिळून राजहंस सिंह आमदार झाले़ माजी महापौर सुनील प्रभू यांना शिवसेनेने पुन्हा एकदा येथून उमेदवारी दिली आहे़ मात्र या वेळीस मनसेचा प्रभाव नसला तरी भाजपाच्या रूपाने सेनेसमोर दुसरे मोठे आव्हान उभे ठाकले आहे़शिवसेनेमधील स्थानिक अंतर्गत वादाचा फटका बसला़ त्याच काळात मनसेने एण्ट्री केल्यामुळे शिवसेनेची सर्वाधिक मते त्यांच्या पारड्यात पडली़ त्यामुळे सेनेच्या हातून निसटलेल्या दिंडोशी मतदारसंघावर आज काँग्रेसचे वर्चस्व आहे़ या विभागात काँग्रेसचे आमदार राजहंस सिंह निवडून आले. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी हे प्रमुख सहा पक्ष वगळता सात अपक्ष, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, पिझन्ट अ‍ॅण्ड वर्कर्स पार्टी आॅफ इंडिया असे एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत़या मतदारसंघात शिवसेनेतल्या नाराजांचे अन्यत्र पुनर्वसन झाले़ सेनेचे दुसरे मोठे दावेदार गजानन कीर्तीकर मोदी फॅक्टरमुळे लोकसभेत निवडूनही आले़ त्यांच्या मुलासही दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू यांचा मार्ग मोकळा झाला़ परंतु भाजपाने उमेदवार उतरल्यामुळे शिवसेनेची गोची झाली आहे़ मनसेमुळे मराठी मतांची विभागणी होणार असून भाजपा उमेदवारीचाही फटका बसण्याचा धोका सेनेला आहे़ येथे काँग्रेसचे राजहंस सिंह, शिवसेनचे सुनील प्रभू, मनसेच्या शालिनी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित रावराणे, भाजपाचे मोहित कंबोज अशी पंचरंगी लढत आहे़ राष्ट्रवादीने माजी नगरसेवक अजित रावराणे यांना उमेदवारी दिली़ परंतु त्यांनाही मराठी मतेच अधिक पडण्याची शक्यता असल्याने शिवसेनेची अडचण वाढली आहे़ याचा फायदा काँग्रेसला होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे़