Join us

मुस्लीम समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा

By admin | Updated: January 7, 2015 01:35 IST

मुस्लीम समाजाला शिक्षणात आणि नोकऱ्यांत आरक्षण देण्याची मागणी करीत छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडतर्फे मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढण्यात आला.

मुंबई : मुस्लीम समाजाला शिक्षणात आणि नोकऱ्यांत आरक्षण देण्याची मागणी करीत छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडतर्फे मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढण्यात आला. न्यायमूर्ती सच्चर समिती अहवाल, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशन व महेमूद रहेमान कमिटीच्या अहवालांमधून मुस्लीम समाजाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वस्तुस्थिती समोर आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जहांगीर मुल्ला यांनी सांगितले. देशासह राज्यातील मुस्लीम समाजाची परिस्थिती हलाखीची असल्याचे त्यांनी सांगितले. २६ जानेवारीपर्यंत मागणीची योग्य दखल घेतली नाही, तर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.