मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या पूर्णत्वासाठी कांदळवनाचा अडसर दूर करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) नव्याने सुरुवात केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी आढावा बैठकीत एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यावर अधिकाºयांनी नव्याने वन विभागाला पत्रव्यवहार केला आहे.ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेतील ४०० मीटर उन्नत मार्गासाठी मुंब्रा स्थानक परिसरातील कांदळवने नष्ट करण्यात येणार आहेत. यासाठी एमआरव्हीसीने नागपूर येथील वन विभागाला कांदळवने नष्ट करण्याच्या परवानगीसाठी पत्रव्यवहार केला. त्यांच्या मंजुरीनंतर उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. त्यानंतर सहा महिन्यांत काम पूर्ण करू, असे एमआरव्हीसीने सांगितले.
कांदळवनाचा अडसर दूर करण्यासाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 06:10 IST