वडखळ : पेण तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत काराव -गडब हद्दीतील कारावी गावचा रहिवासी राजेश नारायण मोकल याला जे.एस. डब्ल्यू. कंपनीत कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यासाठी काराव ग्रामस्थांनी मंगळवारी कंपनीवर मोर्चा काढला.काराव-गडब हद्दीतील रहिवासी राजेश नारायण मोकल गतवर्षी जे. एस. डब्ल्यू. कंपनीत इंदू प्लान्टमधे काम करीत असताना राजेशला अपघात झाला आणि त्याला उजवा हात गमवावा लागला.राजेशला जे.एस. डब्ल्यू. कंपनीत कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे व त्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काराव ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापनाकडे केली होती. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने राजेश मोकल यास नोकरीत घेण्याचे व नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप राजेशला कंपनीत सामावून घेण्यात आलेले नाही. शिवाय नुकसानभरपाईही दिली नाही. याबाबत कंपनीकडे पत्रव्यवहार केला असता टाळाटाळ करण्यात आली.
जेएसडब्ल्यू कंपनीवर मोर्चा
By admin | Updated: March 10, 2015 22:24 IST