Join us

धनगर समाजाचा २ आॅगस्टला मोर्चा

By admin | Updated: July 30, 2014 23:21 IST

मराठा समाज आणि मुस्लीम धर्मीयांना राज्य शासनाने आरक्षण जाहीर केले असतानाच आता धनगर समाजानेही घटनेतील तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमाती (एसटी) नुसार आरक्षण द्यावे

ठाणे : मराठा समाज आणि मुस्लीम धर्मीयांना राज्य शासनाने आरक्षण जाहीर केले असतानाच आता धनगर समाजानेही घटनेतील तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमाती (एसटी) नुसार आरक्षण द्यावे. तसेच महाराष्ट्र सरकारने याची त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी २ आॅगस्ट रोजी ठाण्यात महामोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने २७ जुलैली चंदनवाडी येथील अनुराधा मंगल कार्यालयात समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, मुंबई, मीरा-भार्इंदर, पनवेल, नवी मुंबई आणि माथेरान आदी भागांतील समाजाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.धनगर समाजाला घटनेने एसटी जमातीचे आरक्षण दिले आहे. परंतु, धनगर व धनगड या ‘र’ व ‘ड ’च्या वादामुळे गेली ६५ वर्षे समाज आरक्षणापासून वंचित आहे. आता महाराष्ट्र सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. चंदनवाडी येथील ठाणे महापालिका भवन येथून २ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वा मोर्चा निघेल. मोर्चासाठी ठाणे जिल्हा आदिवासी धनगर समाज कृती समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश चांगण यांनी दिली. (प्रतिनिधी)