Join us  

कामगारांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:45 AM

मुंबई : कामगार कायद्यांतील प्रस्तावित बदलांविरोधात वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर हजारो कामगार धडक देणार आहेत.

मुंबई : कामगार कायद्यांतील प्रस्तावित बदलांविरोधात वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर हजारो कामगार धडक देणार आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांतील कामगारांना एकत्रित आणून, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.या आंदोलनात विविध कामगार संघटना सहभागी होणार असल्याची माहिती, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी दिली. कायद्यातील प्रस्तावित बदलांमुळे हजारो कामगार बेरोजगार होण्याची भीती आहे. कारखाना बंद करण्यासाठी लागणारी १०० कामगारांची अट ३०० कामगारांपर्यंत वाढविण्याची तरतूद नव्या प्रस्तावात आहे. तसे झाल्यास, कामगार संघटना आंदोलन करतील, असा इशारा मोहिते यांनी दिला. सामाजिक सुरक्षिततेचा कायदा लागू करा, किमान वेतनाची अंमलबजावणी करा, आदी मागण्याही आंदोलनात केल्या जाणार आहेत.

टॅग्स :आंदोलनमुंबई