Join us

निकाल हाती येण्यास शुक्रवारची पहाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 06:33 IST

मुंबई : या वेळी व्हीव्हीपॅट यंत्रातील मतांची पडताळणी होणार असल्याने लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल घोषित होण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडण्याची ...

मुंबई : या वेळी व्हीव्हीपॅट यंत्रातील मतांची पडताळणी होणार असल्याने लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल घोषित होण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निकाल नेमके किती वाजेपर्यंत लागतील, याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेगवेगळी वेळ सांगितल्याने संभ्रम वाढला आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएममधील मतांची मोजणीस प्रारंभ होईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशिन्समधील मतांची पडताळणी केली जाणार आहे. ईव्हीएममधील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी केली जाईल. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास वेळ लागू शकतो. मात्र नेमका किती वेळ लागणार, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही.

सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मते, २३ तारखेला मध्यरात्रीनंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल. तर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मते निकाल सायंकाळी ५ पर्यंत स्पष्ट होऊ शकतो.

प्र्रत्येक फेरीनंतर निकाल जाहीर केला जाणार असल्याने कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर हे कळू शकेल, पण व्हीव्हीपॅटमधील स्लिपची पडताळणी होत नाही तोवर अंतिम निकाल जाहीर केला जाणार नाही. त्यामुळेच प्रत्येक मतदारसंघात अंतिम निकालाच्या वेळांमध्ये मोठी तफावत राहू शकेल. सायंकाळी ७ ते दुसºया दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागू शकतील.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019