Join us

गरीबांचे फ्रीज महागले

By admin | Updated: April 19, 2015 23:59 IST

गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची यावर्षी किंमत वाढली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे

पारोळ : गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची यावर्षी किंमत वाढली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे. विजेशिवाय नैसर्गिक पद्धतीने आरोग्यदायी थंड पाणी मिळत असल्याने सामान्यांचा माठ खरेदीकडे कल असतो. यावर्षी माती, मजूरी, भट्टी लावण्यासाठी लागणारे सरपन आदींच्या किंमती वाढल्या असल्याने नाईलाजाने माठांच्या किंमती वाढविल्याचे कुंभार वाड्यातील पिढीजात व्यावसायिकांचे मत आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये वार्षी १५ ते २० टक्क्यांनी माठांची मागणी वाढली आहे.दिवसेंदिवस माठ तयार करण्यासाठी लागणारी माती तसेच इतर साहित्य मिळत नसल्याने वसई परिसरातील कुंभार समाजाने नोकरी करणे पसंत केले आहे. त्यामुळे या परिसरातील हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे गुजरात राज्यातील माठ विक्रीला येत आहे. वाहतूक खर्च अधिक असल्याने त्यांच्या किमतीही जास्त आहे. त्यामुळे स्थानिक माठांना पसंती आहे.