ठाणो : सध्या सर्वत्र डेंग्यूची साथ मोठय़ा प्रमाणावर पसरत आहे. या साथीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करून बाधित रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी कळवा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची सूचना आमदार एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला महापौर संजय मोरे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला आयुक्त असीम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे आदी उपस्थित होते. डेंग्यू रु ग्णांचे प्रमाण लक्षात घेता यासाठी आवश्यक असणारी उपचारपद्धती महागडी असल्याने गोरगरीब जनता उपचार करून घेऊ शकत नाही. यासाठी कळवा रु ग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून डॉक्टर, नर्सेस उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच फायलेरिया विभागासाठी आवश्यक असलेली मशिनरी, मनुष्यबळ यासह दैनंदिन जमा होणा:या घनकच:याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवावी, असेही त्यांनी सांगितले. कळवा रु ग्णालय येथे व खाजगी रु ग्णालयांत दाखल होणा:या डेंग्यूसदृश रु ग्णांनादेखील अत्यावश्यक असणा:या रक्तपेशी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक असणा:या मशिनरी तातडीने उपलब्ध कराव्यात.
नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य करावे, यासाठी कळवा रु ग्णालयात रक्तदानाची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान करून जास्तीतजास्त रक्त संकलित होईल, या दृष्टीने सहकार्य करावे, असे जाहीर आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)