महाड : क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करावयाचे आहे, असे सांगून एकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत पांडुरंग कदम (५०, रा. पंचशीलनगर, महाड) यांना अमित असे नाव सांगणाऱ्या आरोपीने संपर्क साधला. आपण स्टेट बँक क्रेडिट कार्डकडून बोलत असल्याचे सांगून, क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करावयाचे असल्याचे सांगत माहिती घेत, ओटीपी नंबर मागवून त्यांच्या स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड खात्यातून १ लाख ४५ हजार ८७२ रुपये काढून कदम यांची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपीविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्वे हे करत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}