Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात बंगले देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: May 20, 2014 01:27 IST

बंगले आणि प्लॉट देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या व्हिजन ई-मॉल नामक कंपनीच्या संचालक आणि अधिकार्‍यांविरोधात एका ग्राहकाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठाणे : शहापूरमधील लेनाड येथे अत्यंत कमी किमतीत बंगले आणि प्लॉट देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या व्हिजन ई-मॉल नामक कंपनीच्या संचालक आणि अधिकार्‍यांविरोधात एका ग्राहकाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भिवंडी येथे राहणारे डॉ. नियाज अहमद दीन मोहंमद यांनी माजिवडा येथील व्हिजन ई-मॉल नावाच्या कंपनीची स्वस्तात प्लॉट आणि बंगले देण्याची जाहिरात पाहिली होती. ती पाहून त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांना संपर्क केला. कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्यांना या स्कीमचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जानेवारीमध्ये अ‍ॅडव्हान्स म्हणून पाच हजारांचा चेक घेऊन तो वटवला. या बदल्यात त्यांनी जागेची आणि बुकिंगची कागदपत्रे मागितली असता मात्र कंपनीने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर, त्यांना कंपनीच्या अधिकार्‍यांकडून दमदाटी आणि शिवीगाळही करण्यात आली. अखेर, त्यांनी कंपनीचे डायरेक्टर मधुकर पी., जॉन शिंदे, सचिन जाधव, त्रिमूर्ती कोळी आणि इतर अधिकार्‍यांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यातील एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नसून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)