मुंबई : खात्यातून गेलेली रक्कम परत करण्याचे आमिष दाखवत ठगाने शिवडीतील व्यावसायिकाच्या खात्यातील ७९ हजार रुपयांवर ऑनलाइन डल्ला मारला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस तपास करीत आहेत.
.....
दागिन्यांसह कारागिराने काढला पळ
मुंबई : दागिने घडविण्यासाठी दिलेले सोने घेऊन कारागिराने पळ काढल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोशी परिसरात राहत असलेल्या सराफाचे यात, ३१९.०८० ग्रॅम सोन्याचा अपहार करण्यात आला आहे.
.....
फ्लॅटची परस्पर विक्री
मुंबई : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाने एका दाम्पत्याकडून पैसे घेत फ्लॅट परस्पर दुसऱ्यालाच विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार यांनी यात एकूण ४५ लाख ३० हजार ९०० रुपये भरले. तरीही फ्लॅटची कागदपत्रे मिळाली नाहीत. आरोपीने हा फ्लॅट ८० लाख ५२ हजार रुपयांना दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून बोरीवली पोलीस तपास करीत आहेत.
....