Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोलण्यात गुंतवून बँकेत महिलेची केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 06:27 IST

बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका महिलेला बोलण्यात गुंतवून तिची फसवणूक करण्यात आली. मालाडमध्ये हा प्रकार शुक्रवारी घडला.

मुंबई : बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका महिलेला बोलण्यात गुंतवून तिची फसवणूक करण्यात आली. मालाडमध्ये हा प्रकार शुक्रवारी घडला. या प्रकरणी दिंडोशी पोलीस चौकशी करीत आहेत.सेजल गांधी (३४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या मालाड पूर्वेत बँक आॅफ इंडियाच्या खात्यात ४५ हजार रुपये भरण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी गांधी यांना स्लीपवर नोटांचे सिरियल नंबर लिहावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर मदत करत असल्याचे भासवत हातचलाखीने त्यांच्या हातात असलेल्या ४५ हजारांमधील १६,५०० रुपये काढून पळ काढला. गांधी बँकेच्या काउंटरवर पैसे भरायला गेल्या तेव्हा पैसे कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दिंडोशी पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही पाहिले असून त्यात फसवणूक करणाऱ्या व्यक्ती कैद झाल्या आहेत.