Join us  

वाहन विक्रीच्या आमिषाने फसविणा-या ठगाला अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 5:38 AM

कर्जवसुलीसाठी बॅँकेने जप्त केलेल्या किमती गाड्या स्वस्तात मिळवून देण्याच्या आमिषाने, अनेकांना गंडा घालणाºया एका ठगाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किशन जगतियानी उर्फ मनिष लालवानी उर्फ राजू भाई (वय ४१, रा. ओटी सेक्शन पुछ पंचायत, उल्हासनगर) असे त्याचे नाव असून

मुंबई : कर्जवसुलीसाठी बॅँकेने जप्त केलेल्या किमती गाड्या स्वस्तात मिळवून देण्याच्या आमिषाने, अनेकांना गंडा घालणाºया एका ठगाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किशन जगतियानी उर्फ मनिष लालवानी उर्फ राजू भाई (वय ४१, रा. ओटी सेक्शन पुछ पंचायत, उल्हासनगर) असे त्याचे नाव असून, अशा प्रकारे त्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.खासगी बॅँकांच्या अधिकाºयांशी आपली मैत्री आहे. कर्जाची वसुली न झाल्याने जप्त केलेले ट्रक, टेम्पो, कार व अन्य मोठी वाहने कमी किमतीत मिळवून देतो, असे सुनील जगतियानी हा लोकांना आमिष दाखवत त्यांच्याकडून आगाऊ रक्कम घेत असे. त्यानंतर, आपले सर्व मोबाइल नंबर बंद करून पलायन करी. आपलेच हसे होईल, या भीतीपोटी फसलेली व्यक्तीही त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नसे. अशा प्रकारे लाखो रुपयांना गंडा घातल्याबाबत एका व्यापाºयाने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर, पोलिसांनी जगतियानीला अटक केली असता, त्याच्याकडून फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध ठाण्यातील उल्हासनगर, एफएमसी पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल असून, तक्रारदारांनी पवई पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :गुन्हामुंबई