Join us
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या दागिन्यांद्वारे फसवणूक

By admin | Updated: January 21, 2017 23:19 IST

खऱ्या दागिन्यांचा व्यवहार करून व्यापाऱ्यांच्या हाती बनावट दागिने सोपविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने ही

मुंबई : खऱ्या दागिन्यांचा व्यवहार करून व्यापाऱ्यांच्या हाती बनावट दागिने सोपविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आर. के. पाटकर मार्गावर असलेल्या ग्लोबल सिनेमाजवळ बनावट सोन्याची विक्री करणारी टोळी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ९चे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखालील पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक राजेश पडवी, सहायक पोलीस निरीक्षक धराडे, पोलीस हवालदार तेली, शिंदे, पोलीस नाईक पेडणेकर, जाधव, नाईक, पोलीस शिपाई पाटील, महांगडे, पवार आणि महिला पोलीस शिपाई राठोड यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री या परिसरात सापळा रचला व दोघांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)