नवी मुंबई : दिघा येथील अनधिकृत बांधकामांप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अनधिकृत इमारती उभारून बनावट कागदपत्राद्वारे रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पांडुरंग अपार्टमेंट, शिवराम अपार्टमेंट व केरू प्लाझा या अनधिकृत इमारतीमध्ये घरे विकत घेऊन फसवणूक झालेल्या रहिवाशांनी विकासकांविरोधात तक्रार केली. त्यानुसार १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार शनिवारी दुपारी पोलिसांनी चौघांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. रमेश खारकर, किशोर भोईर, नितेश मोकाशी व मुकेश मढवी अशी नावे असून त्यांना रविवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}